गावाविषयी माहिती
प्रभू श्री रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले शिंपी टाकळी हे गाव महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या पवित्र गोदावरी माता नदीच्या काठी वसलेले टुमदार असे एक छोटेसे प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे १६८७ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २, अंगणवाडी केंद्रे २ व व्यायामशाळा १, रामचंद्र आनंदराव लोखंडे सार्वजनिक वाचनालय अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सर्व देवी देवतांचे मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कोबी, फुलकोबी, ऊस, सोयाबीन, कांदा, शिमला मिर्ची व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. नाशिक जिल्यात भाजीपाला उत्पन्न मध्ये शिंपी टाकळी गावाचा मोठा वाटा आहे.
शिंपी टाकळी ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थींना घरकुल लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रसलपूर गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF) दर्जा मिळवला आहे. जल जीवन मिशन व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
शिंपी टाकळी गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.
भौगोलिक स्थान
शिंपी टाकळी हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर व नाशिक शहरापासून २० किमी अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण क्षेत्रफळ ३६७.४४ चौ.कि.मी. असून ग्रामपंचायतीमध्ये ३ वार्ड आहेत. एकूण २७१ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या १६८७ आहे. त्यामध्ये ८६६ पुरुष व ८२१ महिला यांचा समावेश होतो.
गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे. गावालगत गोदावरी नदी आहे ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो. येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे. उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३८° से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात ७° से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.
शिंपी टाकळी गाव कोबी, फुलकोबी व भाजीपाला उत्पादनासाठी संपूर्ण नाशिक जिल्यात प्रसिद्ध आहे.
लोकजीवन
शिंपी टाकळी गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून कोबी, फुलकोबी, ऊस, कांदा, मका व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व लघुउद्योग यामध्येही कार्यरत आहेत.
गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.
येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
शिंपी टाकळी गावाच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.
लोकसंख्या
पुरुष
स्त्रिया
एकूण
संस्कृती व परंपरा
शिंपी टाकळी गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा व अखंड हरीनाम साप्ताह यामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा आणि श्रद्धेची भावना दृढ होते.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे गावातील मुलं, तरुण व वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.
गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळ यांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवीन पिढी आधुनिकतेशी जुळवून घेते.
स्त्रियांचा सहभाग ग्रामविकासात तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर असतो. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.
यामुळे शिंपी टाकळी गावाचे लोकजीवन परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम साधत आजही एकात्मतेने टिकून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
- ग्रामदैवताचे मंदिर – वेताळ बाबा महाराज हे गावातील प्रमुख देवतेचे मंदिर आहे हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असून येथे दरवर्षी यात्रा, धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
- हनुमान मंदिर – गावाच्या मध्यवर्ती भागात असलेले हे मंदिर उत्सव व सणासुदीला ग्रामस्थांच्या भेटीगाठींचे केंद्र असते.
- गोदावरी नदी – दक्षिणोत्तर दीड कोस वाहणाऱ्या गोदावरी नदीमुळे जलसंधारणाची चांगली सोय होते यामुळे शेती, मासेमारी, पर्यटन विकास यामुळे परिसरात नैसर्गिक सौंदर्य खुलून दिसते.
- महादेव मंदिर – शिंपी टाकळी गावामध्ये महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर संपूर्ण दगडात बांधले असून ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान आहे.
- स्मशान भूमी – शिंपी टाकळी गावातील स्मशान भूमी हे पंचक्रोशीतील प्रमुख आकर्षण आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे या वैकुंठधाम परिसरास अनोखे आकर्षण आहे.
जवळची गावे
शिंपी टाकळी गाव गोदावरी नदीच्या किनारी वसलेले असून आजूबाजूला अनेक गावे आहेत. ही गावे शिंपी टाकळी गावाशी सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेली आहेत.
चाटोरी, नागापूर, वर्हेदारणा, दारणासांगवी, लालपाडी ही शिंपी टाकळी आसपासची प्रमुख गावे आहेत.
गटविकास अधिकारी

गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत प्रशासन

सौ.सुषमा प्रकाश बोडके
सरपंच
(+91 ) 98818 08953

श्री. रमेश शिवराम काळे
उपसरपंच
(+91 ) 75881 74415

श्री. श्रावण देवराम गांगुर्डे
सदस्य
(+91 ) 70209 43395

सौ. इंदुबाई अनिल बोडके
सदस्य
(+91 ) 95034 65714

श्री. शिवाजी मधुकर लोखंडे
सदस्य
(+91 ) 99212 63644

श्री. सचिन कैलास बोडके
सदस्य
(+91 ) 97305 81417

श्रीमती.मंदाबाई भगवान बोडके
सदस्य
(+91 ) 96895 40049

सौ. वनिता नारायण लोखंडे
सदस्य
(+91 ) 97637 99948
समन्वय कर्मचारी
अ.नं. | नाव | विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | श्रीमती.आशा देवराम गोडसे | ग्रामपंचायत अधिकारी | (+91) 76204 27730 |
2. | सौ. सारला विनायक बोडके | ग्रामपंचायत अधिकारी | |
3. | श्री. शेखर बाजीराव पाटील | ग्राम महसूल अधिकारी | (+91) 80558 07496 |
4. | श्री. हरी अर्जुन गांगुर्डे | पोलीस पाटील | (+91) 84118 16791 |
5. | श्री. सुरेश प्रकाश गांगोडे | सहाय्यक कृषी अधिकारी | (+91) 98813 15433 |
6. | श्री. माणिक गाडे | कोतवाल | (+91) 98509 69250 |
7. | श्री. सचिन शरद लोखंडे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 88889 65727 |
8. | श्री. बाळू वामन गांगुर्डे | ग्रामपंचायत कर्मचारी | (+91) 90110 17537 |
ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचेकडे मिळणारे दाखले
जन्म नोंद दाखला
मृत्यु नोंद दाखला
विवाह नोंदणी दाखला
दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला
निराधार असल्याचा दाखला
नमुना ८ चा उतारा
शिक्षण विभाग
अंगणवाडी विभाग
विद्यार्थी संख्या
अंगणवाडी नाव | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
अंगणवाडी ५२ | 28 | 38 | 66 |
अंगणवाडी ३०५ | 28 | 55 | 83 |
एकूण | 56 | 93 | 149 |
अंगणवाडी सेविका माहिती
नाव | पद नाम | मोबाईल क्रमांक |
---|---|---|
श्रीम. मीना मनोहर लोखंडे | अंगणवाडी सेविका | (+91) 98814 16940 |
सौ. तृप्ती भारत लोखंडे | अंगणवाडी सेविका | (+91) 90227 58079 |
सौ. रुपाली विनोद कोकाटे | अंगणवाडी मदतनीस | |
सौ. सविता सोमनाथ लोखंडे | अंगणवाडी मदतनीस | (+91) 96992 85076 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंपी टाकळी
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 05 | 07 | 12 |
दुसरी | 05 | 05 | 10 |
तिसरी | 06 | 07 | 13 |
चौथी | 05 | 05 | 10 |
एकूण | 21 | 24 | 45 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्रीमती. सुवर्णा रामदास कदम | (+91) 99601 64090 |
श्री. दिलीप कारभारी मोरे | (+91) 86687 40873 |
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण वस्ती शिंपी टाकळी
विद्यार्थी संख्या
इयत्ता | मुले | मुली | एकूण |
---|---|---|---|
पहिली | 01 | 05 | 06 |
दुसरी | 07 | 05 | 12 |
तिसरी | 03 | 05 | 08 |
चौथी | 03 | 05 | 08 |
एकूण | 14 | 20 | 34 |
शिक्षक माहिती
नाव | मोबाईल क्रमांक |
---|---|
श्री. सविता बस्तीराम कुटे | (+91) 98814 13043 |
श्री. बाळू बापूराव पाखरे | (+91) 94210 96920 |
आरोग्य विभाग
अ.नं. | नाव | आरोग्य विभाग पद | संपर्क क्रमांक |
---|---|---|---|
1. | डॉ. सुजित कोशिरे | तालुका वैद्यकीय अधिकारी | (+91) 94227 57565 |
2. | श्री. इरेश पाटील | पी.एच.सी. वैद्यकीय अधिकारी | (+91) 79722 49030 |
3. | श्री. अक्षय पाटील | उपकेंद्र वैद्यकीय अधिकारी | (+91) 96767 56021 |
4. | श्री.मुरलीधर सांगळे | आरोग्य सेवक | (+91) 98698 65611 |
5. | सौ. वनिता देशपांडे | आरोग्य सेविका | (+91) 95039 91213 |
6. | सौ.सुनिता सोपान डूमणे | आशा वर्कर | (+91) 88053 79664 |
7. | सौ.मनीषा माणिक बोडके | आशा वर्कर | (+91) 75072 92362 |